चक्रधर स्वामी मानमुक्तीचे साधनदाते: भारतभूषण शास्त्री
चक्रधर स्वामी मानमुक्तीचे साधनदाते:
भारतभूषण शास्त्री
महाराष्ट्रात बाराव्या शतकात उगम पावलेल्या संप्रदायांपैकी महानुभाव संप्रदायाकडे प्रमुख्याने पहिल्या जाते. या संप्रदायाचे प्रमुख तथा प्रवतर्क सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी होय . त्यांचा जन्म भडोच गुजरात येथे झाला.काही काळानंतर त्यांनी गुजरात प्रांत सोडला. त्याच वेळी रुद्धपुर मधील श्री गोविंद प्रभू यांच्याकडून चक्रधर स्वामींनी ज्ञान शक्तीचा स्वीकार करून संपूर्ण महाराष्ट्रभर परिभ्रमण सुरू केले.
12 व्या शतकात महाराष्ट्रातील समाज हा पूर्णपणे अज्ञान,अंधश्रद्धा,कर्मकांड यांमध्ये अडकला होता त्याच वेळी स्वामींनी मराठी माणसाला खऱ्या अर्थाने सत्य,ज्ञान, शांती आणि ज्ञानाचा प्रकाश समाजाला दाखवला .अज्ञान सामाजाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला .सर्वांचा परमेश्वर एक असून स्री-पुरुष, शूद्र या सर्वांना मोक्षप्राप्तीचा अधिकार आहे असं सांगून खचलेल्या शूद्र वर्गाला आपलंसं केलं. अस केल्यानंतर काही कथाकथीत प्रवृत्तीनी याला विरोध केला परंतु सर्वज्ञ आपल्या विचारावर ठाम राहिले यातूनच नव्या आणि सत्य ज्ञानाचा आविष्कार असलेल्या महान अनुभवी असलेल्या लोकांचा वर्ग समोर आला. यादवकाळात चाललेल्या विषमता मूलक परिस्थितीला त्यांनी वाचा फोडली आणि समतेचे रोपटे लावले.
स्त्री-पुरुष विषमता हा विचार स्वामींना मान्य नव्हता.पुरुषा सारखेच स्त्रियांना पण स्वातंत्र्य आहे या भूमिकेतून त्यांनी आपल्या संप्रदायात स्त्रियांना संन्यास घेण्याचा मार्ग खुला करून दिला. आज याच प्रश्नाचा जर विचार केला तर स्त्रियांचे पहिले मुक्तिदाते म्हणून चक्रधर स्वामींचा गौरव या ठिकाणी होतो.एवढंच नव्हे तर बळेगाव येथील उपाध्य कामाळााईसा नावाची स्त्री पुढे संप्रदायाची आचार्य बनते. हे सर्व त्यांच्या समानतेच्या तत्वामुळे घडले. मराठीची आद्य कवयित्री महदंबा ही स्वामींच्या प्रेरणेेेमुळेच तिला काव्यत्व सुचलं.स्त्रियांच्या स्री धर्माबद्दल विटाळ माननाऱ्याना स्वामिनी विज्ञानाद्वारे त्याचे सत्य उलगडून स्त्रियांना समाजात मोठे स्थान दिले. तसेच स्त्रियांनी कस राहावं याविषयी ते म्हणतात "जेतुलेही अच्छादनिय अवयव भलत्याही दृष्टीस ना पडावे " असे सांगून स्त्रियांना लज्जारुप धर्माचे रक्षण करावयास सांगतात. आपली वेशभूषा आणि राहणी मान कस असावं हे स्पष्ट करतात. आठशे वर्षांपूर्वी संगीतलेले विचार आजच्या स्त्रीला खरोखरच न्याय मिळवून देण्यास पात्र ठरतात.
चातुवर्ण पद्धतीत त्याकाळी दिन दलित बांधव होरपळून निघाला होता अशावेळी या समाजाला स्वामींनी आपलंसं केलं.आणि त्यांना सर्वसामान्यांच्या पंक्तीत बसण्याचे स्थान दिले.अनेक अविचारी लोकांनी या गोष्टीला विरोध केला पण स्वामिनी त्यास जुमानले नाही .एके दिवशी स्वामींचा मुक्काम चुतर्विध मढात असताना स्वामींचे प्रवचन चालू असते.तितक्यात प्रवचन ऐकण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी काही मातंग आले होते. तिथे काही महाजनही उपस्थित होते. स्वामी प्रवचन सोडून बाहेर येतात आणि त्यांची भेट घेतात . त्यांनी आणलेला लाडू स्वीकार करतात.आणि आपल्या सर्व भक्ताना तो लाडू प्रसाद म्हणून देतात. त्यातील काही महाजन तर स्वामींकडे पाहतच राहिले. स्वामींची आर्त ओढ लागलेल्या मातंग समाजाला स्वामींनी आपल्या पंथाची द्वार खुली करून दिली.आपलंसं केलं. यामुळेच स्वामी दिंनदलितांचे कैवारी म्हणून ओळखले जाऊ लागले.
मानवी कल्याणाच्या पवित्र ब्रह्मविद्येचे उदघाटन स्वामींनी एका आदिवासी व्यक्तीकडून केलं.आपलं 12 वर्षाच मौन त्यांनी सोडलं आणि सशा सारख्या निसर्गावर जगणाऱ्या प्राण्याचं सालबर्डी येथे रक्षण केले. तेव्हा स्वामींच्या मुखातून पहिलं सूत्र जन्माला येत "हां गा येथ शरण आलेया काई मरण असे" इथूनच स्वामींनी अहिंसा तत्व सर्वसामान्य माणसाला समजावून सांगितलं. ब्राम्हविद्येसारख्या शास्त्राच उदघाटन एका आदिवासी समाजाला देऊन स्वामींनी आदिवासी समाजाला न्याय मिळवून दिला. लोकशाही तील न्याय, स्वातंत्र्य, बंधूता, समता या मूल्यांचा खरा अंगीकार स्वामींनी त्या काळी केला हे विशेष.
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मराठी
भाषेचा प्रचंड अभिमान बाळगत मराठी भाषेला धर्मभाषेचे स्थान देऊन आपल्या प्रत्येक शिष्याला त्यांनी मराठीतूनच ग्रंथरचना करण्याचा आदेश दिला होता. त्यातूनच लीळा चरित्र या मराठीच्या आद्य ग्रंथाची निर्मिती झाली आहे.
एवढेच नव्हे एके दिवशी केशीराज व्यास म्हणाले मी स्वामींच्या लीळा संस्कृतात बांधू तेव्हा आचार्य नागदेव त्यांना ठणकावून सांगतात मज "तुमचा अस्मात कस्मात मी नेणगा, मज श्रीचक्रधरे निरुपीली मऱ्हाटी तियाचि पुसा" असं म्हणून स्वामींच्या शिष्यानेही मराठी भाषेचा पुरस्कार केला.
-प्रा.भारतभूषण शास्त्री, ९४०५२६९८२२


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा