पांच शतें कर्मभूमि - श्री श्रीकांत प्रे . चंद्रिकापुरे ,नागपूर.
पांच शतें कर्मभूमि
श्री श्रीकांत प्रे . चंद्रिकापुरे ,नागपूर.
पूर्वपीठिका
इसवी सनाच्या तेराव्या शतकात सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींनी महाराष्ट्रात मुख्य करून महानुभाव पंथाची स्थापना केली . आज महानुभाव पंथाचे लाखो अनुयायी महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतभर पसरलेले आहेत . महाराष्ट्राव्यतिरिक्त पंजाब , हरियाणा आणि दिल्ली येथे महानुभाव पंथाचे अनुयायी विपुल प्रमाणात आढळतात . सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींनी पंथाच्या स्थापनेबरोबराच एक आगळेवेगळे ईश्वरीय तत्त्वज्ञानसुद्धा जगापुढे मांडले . त्या तत्त्वज्ञानाला पंथीय लोक ' ब्रह्मविद्याशास्त्र ' असे संबोधतात . श्रीचक्रधरस्वामी प्रत्यक्ष निर्गुण - निराकार , सर्वशक्तियुक्त , सर्वात्मक , सर्वसाक्षी परब्रह्म परमेश्वरावतार आहेत अशी सर्व पंथीयांची दृढ़ श्रद्धा आहे . म्हणूनच श्रीचक्रधरस्वामींचा सर्वज्ञ किंवा केवळ ' स्वामी ' या सार्थ नावाने उल्लेख करण्यात येतो . भगवान श्रीकृष्ण श्रीमद्भगवद्गीतेत सांगतात की , " मयाध्यक्षेण प्रकृती : सूयते सचराचरम " ( अध्याय ९ , श्लोक १० ) . अर्थात , प्रत्यक्ष परमेश्वराच्या अध्यक्षतेखाली ' प्रकृती ' या चराचर सृष्टीची रचना करते . आपल्या पृथ्वीलासुद्धा वैशिष्ट्यपूर्ण रीतीने रचण्यात आलेले आहे . अनेकदा भारतीय दर्शनशास्त्राला असा प्रश्न विचारण्यात येतो की , अनेक देवीदेवता , अनेक परमेश्वरावतार हे फक्त भारत देशाच्या भूमीवरच का अवतार घेतात ? भारताबाहेर ते सहसा का आढळत नाहीत ? या प्रश्नाचे समर्पक वा समाधानकारक उत्तर कुठलेही मान्य दर्शनशास्त्र देत नाही . पण महानुभाव तत्त्वज्ञानामध्ये या प्रश्नाचे उत्तर आपल्याला अचूक सापडते . पंथीय तत्त्वज्ञानाच्या अनेक व्यावच्छेदिक लक्षणामध्ये हेसुद्धा एक महत्त्वाचे लक्षण आहे . सृष्टीचा कारभार चालवण्यासाठी ' कर्म निष्पत्ती ' ही नितांत आवश्यक गरज आहे . कर्म निष्पत्ती झाली तरच कर्मफळ निर्माण होईल व पुढे सृष्टीचे कार्य सुरू राहील . त्याच अनुषंगाने ज्या भूमिमध्ये कर्माची निष्पत्ती होते त्या भूभागाला ' कर्मभूमी ' असे नाव दिले असून त्याची व्याख्या महानुभाव तत्त्वज्ञानामध्ये ठळकपणे केलेली आहे . ही कर्मभूमी सर्वसाधारणपणे भारत देश व त्याच्या आजुबाजूचा थोडा प्रदेश आहे . अशा प्रकारे भारतभूमीवर जीवाने केलेल्या कर्माची शुभाशुभ फळे निर्माण होतात व जीवाला योग्य आचार करून परमेश्वरीय ज्ञानाला व प्रेमाला पात्र होता येते . कर्मभूमी बाहेर हे शक्य नाही . म्हणूनच सर्व देवीदेवतांचे अवतार आणि परमेश्वर अवतार बव्हंशाने भारत देशातच झालेले आहेत व पुढेही होतील . आता आपण या कर्मभूमिचा पंथीय तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून व आज उपलब्ध असलेल्या जगाच्या माहितीवरून अधिक सखोल विचार करू .
कर्मभूमीची मर्यादा
सर्वज्ञे म्हणितले , " हिमासेतुमध्ये पांच शतें कर्मभूमि " . याचा अर्थ हिमालयापासून रामसेतु म्हणजे आजचे रामेश्वरमपर्यंत ५०० योजने एवढी कर्मभूमीची स्वरूप मर्यादा आहे . अर्थात हिमालय ते रामेश्वर यांच्या मध्यबिंदूपासून सभोवार गोलार्धात येणारा भाग म्हणजे कर्मभूमी . हीच व्याख्या ' महानुभाव तत्त्वज्ञानाचे चिंतन ' या पुस्तकात पृष्ठ क्र . ७२ वर श्री . तु . कपाटे उपाख्य कै. विश्वनाथबाबा कपाटे यांनी सांगितलेली आहे . आता यावर आपण पुढील विचार करू . ' सूर्यसिद्धांत ' हा चौथ्या ते पाचव्या शतकातील प्रसिद्ध ग्रंथ आहे . या ग्रंथात एक योजन अंतर ५ मैल म्हणजे जवळपास ८ किलोमीटर एवढे मानण्यात आले आहे . तसेच आर्यभट्टाने सुद्धा ते तसेच मानले आहे .
आजच्या काळात एक योजन म्हणजे ८ मैल एवढे मानण्यात येते आणि एक मैल म्हणजे १.६ किलोमीटर . अर्थात १ योजन = ८ मैल = ८x१.६ कि . मी . = १२.८ कि . मी . = १३ कि . मी . ही गणना १४ व्या शतकातील गणितज्ञ ' परमेश्वर ' याने सांगितलेली आहे . त्याचप्रमाणे ए . सी . भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनीसुद्धा एक योजन अंतर हे ८ मैल म्हणजे १३ कि . मी . एवढेच मानले आहे . या गणनेनुसार कर्मभूमीची ५०० योजन स्वरूप मर्यादा ही ५०० X १३ = ६५०० कि . मी . एवढी होते . रामेश्वरपासून उत्तरेकडे जर ६५०० कि . मी . अंतर जगाच्या नकाशावर मोजले तर ते चीन , किर्गिजिस्तान आणि कजाकिस्तान पार करत थेट रशियातील ' ओबची खाडी ' पर्यंत जाऊन थडकते . म्हणजे हिमालयाच्याही पलीकडे जवळपास ३००० कि . मी . अशा प्रकारे ' हिमासेतुमध्ये ' या प्रमाण व्याख्येला बाधा येते . त्यामुळे १ योजन = १३ कि . मी . हे या ठिकाणी योग्य बसत नाही .
' सूर्य सिद्धांत ' किंवा आर्यभट्टाचे १ योजन = ८ कि . मी . हे परिमाण वापरले तर कर्मभूमीची मर्यादा ५०० ४८ = ४००० कि . मी . एवढी भरते . रामेश्वरपासून हे अंतर उत्तरेस जगाच्या नकाशावर चीन आणि किर्गिजिस्तान ओलांडून कज़ाकिस्तानमधील बल्खाश सरोवराखालील ' करातल ' प्रांतापर्यंत पोचते . आणि अशा प्रकारे हिमालय ओलांडून पलीकडे जाते . म्हणून हे परिमाणही व्याखेत बसत नाही . विकिपिडियावर माहिती पाहिली असता काही भारतीय १ योजन हे ६.४ कि . मी . ते ८ कि . मी . पर्यंत मानत असल्याचे आढळून आले . जर १ योजन = ६.४ कि . मी . घेतले तर कर्मभूमीची मर्यादा ५००× ६.४ = ३२०० कि . मी . एवढी भरते . रामेश्वरपासून हे अंतर उत्तरेस चीनमधील झिनजियांग प्रांतातील ' काशी ' अर्थात ' काशघर'पर्यंत पोचते . म्हणजे हिमालयाचा पलीकडचा पायथा . त्यामुळे हे परिमाण हिमासेतुमध्ये या व्याख्येत चपखल बसते . हिमासेतुमध्ये या शब्दाने ' हिमालयापासून हा अर्थ अभिप्रेत आहे . त्याच अनुषंगाने पाहिले असता याचा अर्थ ' हिमालयाच्या अलीकडील पायथ्यापासून ' किंवा झालेच तर ' हिमालयाच्या शिखारापासून ' असा घेता येईल . हिमालयाच्या पलीकडील पायथ्यापासून असा अर्थ काही प्रक्षेपित होत नाही . आणि म्हणून माझ्या मते काशघरपासून सर्वात जवळचे हिमालयाचे सर्वोच्च शिखर आपली कर्मभूमीची उत्तर सीमा निर्धारण करण्यासाठी घ्यावी लागेल .(चित्र १ : काशघर चित्र २ : हिमशिखर चित्र ३ : रामेश्वरम चित्र ४ : कन्याकुमारी ते २) (नोंद-कृपया ही चित्रे फोटोमध्ये असल्यामुळे आपल्याला दाखवता आली नाही ,आपण मॅपवर या नावाने शोधू शकता)
हिमालयाचे २ हे शिखर माउंट एव्हरेस्टनंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे . समुद्रसपाटीपासून त्याची उंची ८६११ मीटर आहे . हे शिखर चीन , भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर असलेल्या गिलगिट - बाल्टिस्तान या प्रांतात वसलेले आहे . २ शिखर काशघर पासून जवळपास ४०० कि . मी . अंतरावर भारताच्या दिशेने पड़ते . अशा प्रकारे कर्मभूमीची उत्तरेकडील सीमा हे २ शिखर घेणे सर्वथा योग्य वाटते . या प्रकारे कर्मभूमीची दक्षिणेकडील सीमा रामेश्वर ' आणि उत्तरेकडील सीमा ' २ शिखर ' असे आतापर्यंत आपण निर्धारित केले आहे .
रामेश्वर ते घ २ शिखर हे अंतर गूगल मॅपवर २ ९ ६ ९ कि . मी . एवढे भरते . या अंतरास ५०० योजन मानल्यास १ योजन अंतर हे ५.९ ३८ कि . मी . एवढे येते . परंतु १ योजन अंतर ६ की . मी . पेक्षा कमी कोणीही सांगितलेले नाही . ते किमान ६ कि . मी . च्या वर तरी भरावे . याचे निरसन करता येण्यासारखे आहे . ते पुढीलप्रमाणे : ' हिमासेतु'मध्ये म्हणताना हिमालयापासून हिंद महासागरापर्यंतचा सर्व भूभाग अभिप्रेत दिसतो . कारण हा सर्व भूभाग उत्तरेस पसरलेला हिमालय आणि दक्षिणेस असलेला महासागर यांच्या मध्ये असणारा वैशिष्ट्यपूर्ण असा प्रदेश आहे . तसेच रामेश्वरच्या जवळपास दक्षिणेकडील प्रदेशास वेगळे करणारे कुठलेही भौगोलिक वैशिष्ट्य , म्हणजे पर्वतरांग , नदी , दरी असे काही नाही . त्यामुळे कर्मभूमीचे दक्षिण टोक कन्याकुमारी असे घेणे सर्वथैव योग्य वाटते . त्या अर्थी उत्तरेस हिमालयाचे शिखर २ ते दक्षिणेस कन्याकुमारी व त्या सभोवारची गोलाकार व्याप्ती ही कर्मभूमीची स्वरूप मर्यादा मानायला हरकत नाही . या प्रकारे कन्याकुमारी ते २ शिखर असा व्यास धरून वर्तुळ काढल्यास चित्र क्र . ५ (सोबत दिलेल्या PDF मध्ये पाहावे) मध्ये दाखविल्याप्रमाणे ' मेळघाट ' हा केंद्रबिंदू घेऊन कर्मभूमीची स्वरूप मर्यादा दाखविता येते . कन्याकुमारी ते २ हे अंतर परत गूगल नकाशावर ३० ९ ० कि . मी . एवढे आहे . या अंतरास ५०० योजन एवढे मानले तर १ योजन = ६.१८ कि . मी . एवढे येते व आतापर्यंत पाहण्यात आलेल्या योजन ' या परिमाणाच्या परिघात बसते . या प्रकारे सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींनी सांगितलेली कर्मभूमीच्या व्याप्तीची व्याख्या , ' योजन ' या परिमाणाच्या वेगवेगळ्या मान्यता , भौगोलिक वैशिष्ट्य समग्र विचार करून आपण १ योजन = ६.१८ कि . मी . या व्याख्येपर्यंत येऊन पोचलो . पण ते तसेच असेल असा अट्टहास मी काही करत नाही . स्वामींच्या वचनाला धक्का लागू न देता कर्मभूमीची दक्षिण सीमा कर्मभूमि रामेश्वरपर्यंतच मानायला काहीही हरकत नाही . आता आपण १ योजन = ६.१८ कि . मी . या विधानावरून पुढील गणना करू .
ब्रह्मांडाचा व्याप
कर्मभूमीची स्वरुप मर्यादा ५०० योजन = ५००×६.१८ = ३० ९ ० कि . मी . हे आपण पाहिले . महानुभाव तत्त्वज्ञानानुसार कर्मभूमीच्या देवतांपासून विश्वेच्या देवतेपर्यंत देवतांचे ९ थोवे ( थर ) आहेत . यापैकी चैतन्या माया सोडून सर्वथोव्यांची स्वरूप मर्यादा खालच्या थोव्यापेक्षा दहापटीने जास्त सांगितलेली आहे . ती खालील तक्त्याद्वारे अधिक स्पष्ट होईल
(अनुक्रमे)देवतेचा प्रकार ------स्वरूप मर्यादा ( योजन ) -------स्वरूप मर्यादा ( कि . मी . )
कर्मभूमिच्या देवता ---५०० ----३०९०
अष्टौ देवयोनी ---५००० ---३०९००
अंतराळ ---५०००० ---३०९०००
स्वर्ग ---५००००० ---३०९००००
कैलास - वैकुंठ ---५०००००० ---३०९०००००
क्षिराब्धी ---५००००००० ---३०९००००००
अष्ट भैरव ---५००००००००---३०९०००००००
विश्वरूप ---५००००००००० ---३०९००००००००
माया ---अमर्याद ---अमर्याद
महानुभाव तत्त्वज्ञानाच्या सिद्धांतानुसार एक ब्रह्मांड हे विश्वरूप देवतेच्या स्वरूपाएवढे मानलेले आहे . म्हणजे एका ब्रह्मांडाची स्वरूप मर्यादा अर्थात व्याप्ती ही वरील तक्त्यानुसार ३० ९ ०००००००० कि . मी . म्हणजे सोप्या शब्दांत ३० ९ ० कोटी कि . मी . अशी होईल . अशा प्रकारे विचार केला असता कर्मभूमीच्या सभोवार कर्मभूमीच्या मध्यापासून ३० ९ ० / २ = १५४५ कि . मी . त्रिज्येचे गोलाकार ब्रम्हांड आहे . आता याची तुलना आपण आपल्या सूर्यमालेबरोबर करू .
पृथ्वीपासून सूर्याचे सरासरी अंतर १५०००० लक्ष कि . मी . म्हणजे १५० कोटी कि . मी . एवढे आहे . ( स्रोत : विकिपिडिया ) म्हणजे ढोबळमानाने पाहिले असता ब्रह्मांडाची त्रिज्या यापेक्षा दहापट अधिक आहे . आपल्या सूर्यमालेतील सर्वांत लांबचा ग्रह नेपच्युन मानला जातो . प्लुटो जरी सूर्यमालेतील शेवटला ग्रह असला तरी त्याची परिभ्रमण कक्षा नेपच्युनच्या कक्षेला छेद देते . त्यामुळे नेपच्युन हाच ग्रह सूर्यापासून सर्वात लांबचा मानला जातो , नेपच्युनचे सुर्यापासूनचे अंतर ४.४ ९ ८ बिलियन कि . मी . ( स्रोत : guinnesworldrecord.com ) आहे . गणना सोपी व्हावी म्हणून हे अंतर आपण ठोकळमानाने ४.५ बिलियन कि . मी . म्हणजे ४.५ x १०००० लक्ष कि . मी . = ४५० कोटी कि . मी . असे घेऊ . त्याच प्रकारे ब्रह्मांडाची व्याप्ती सुद्धा ३० ९ ० कोटी कि . मी . ऐवजी ३००० कोटी कि.मी. घेऊ . अशा प्रकारे ब्रह्मांड आणि सूर्यमालेतील परस्पर आकारमान खालील चित्रावरून स्पष्ट होईल .
जीवाची स्वरूप मर्यादा
महानुभाव तत्त्वज्ञानानुसार जीव , देवता , प्रपंच आणि परमेश्वर हे चार अनादिसिद्ध पदार्थ आहेत . त्यापैकी जीव हा बद्ध - मुक्त असून परमेश्वरीय आनंद उपभोगण्यास पात्र आहे किंवा आधिकारी आहे . या जीवाचे मूळ स्वरूप १०० ब्रह्मांड एवढे सांगितलेले आहे . आतापर्यंत केलेल्या विवेचनानुसार १०० ब्रह्मांड = १००×३००० = ३००००० कोटी कि.मी. म्हणजेच जीवाची स्वरूप मर्यादा ही ३००००० कोटी कि . मी . असे सिद्ध होते . अंतराळातील बृहद अंतरे मोजण्यासाठी ' प्रकाशवर्ष ' हे एकक ( unit ) वापरण्यात येते . १ प्रकाशवर्ष ' म्हणजे पृथ्वीवरील एका वर्षाच्या काळात प्रकाशाने कापलेले अंतर . प्रकाशाचा वेग सर्वसामान्यपणे ३००००० कि . मी . प्रतिसेकंद २ ९९ ७ ९ २४५८ मीटर प्रतिसेकंद असा घेण्यात येतो . म्हणजेच ३०००००×६०x६०×२४ / १००००००० = २५ ९ २ कोटी कि . मी . प्रतिदिवस . तद्वतच , जीवाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायला प्रकाशाला ३००००० / २५ ९ २ = ११५.७४ दिवस , अर्थात ११५ दिवस , १७ तास , ४५ मिनिटे आणि ३६ सेकंद लागतील .
समापन
अशा प्रकारे आपण सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींनी सांगितलेल्या कर्मभूमीच्या प्रमाण वाचनाचा धागा धरून पुढे ब्रह्मांडाचा व्याप आणि जीवाच्या स्वरूप मर्यादेपर्यंत येऊन पोचलो . उपलब्ध असलेली भौगोलिक माहिती , जगाचे व भारताचे नकाशे आणि अंतर्जालाची ( internet ) मदत याचा उपयोग करून हा लेख लिहिलेला आहे . यात सांगितलेली अंतरे व नकाशे अचूकच असतील असे नाही . यात अजूनही सुधारणेला बराच वाव आहे . या लेखाद्वारे ब्रह्मांडाचा व जीव स्वरूपाचा व्याप मानवी बुद्धीच्या आकलन क्षमतेत बसविण्याचा प्रयत्न मी केला आहे . या तर्काला अजूनही पुढे रेटता येईल . पण तूर्तास एवढे पूरे .
पूर्वप्रकाशित-केशर गौरव ग्रंथ



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा