पहिले महदंबा साहित्य संमेलन

 

आद्य मराठी कवयित्रीच्या नावाचे पहिले महदंबा साहित्य संमेलन हे जालना जिल्ह्यातील दहीपुरी येथे १८-१९-२० ऑक्टोबर २०१४ या काळात भरवले गेले होते. महानुभाव साहित्य, शिक्षण, संशोधन प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या या संमेलनाच्या स्थळाला आचार्य भानुकवी जामोदेकर साहित्य नगरी असे नाव दिले होते. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर शेळके असून या साहित्य संमेलनाचे उदघाटन ज्येष्ठ साहित्यिक महंत बाभुळगावकरशास्त्री यांनी केले होते. अर्चनाताई कुरेकर यांनी महदंबेचे धवळे या विषयावरील परिसंवादात आपला सहभाग नोंदवला होता. या साहित्य संमेलनाचे आयोजन प्रा. भारतभूषणशास्त्री यांनी केले होते.


अध्यक्ष


समारोपिय अध्यक्ष-महंत बा.भो.शास्त्री

बातमी

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट