'पुरोगामी सामाजिक चळवळीचे उगमस्थान - श्रीगोविंद प्रभू महाराज''

 'पुरोगामी सामाजिक चळवळीचे उगमस्थान - श्रीगोविंद प्रभू महाराज''

     सुमारे ११ व्या शतकाच्या काळात विषमता व जातीयतेने स्तोम माजविले होते. ऊच्चवर्णीयाने शुद्र, अतिशुद्रांच्या घरी जाणे, पाणी पिणे, जेवन करणे घोर पातक व अधर्म समजल्या जायचा. जातीभेदाचे बंधनरूपी भूत तत्कालीन समाजातील लोकांच्या मानगूटीवरच बसले होते. ऐवढचं नाही तर तत्कालीन समाजाच्या रोमारोमात, नसांनसांत या जातीयतेने, विषमतेने आपले ठाण मांडले होते.धर्माचा आणी कर्मकांडाचा सामान्य जनतेवर जबरजस्त पगडा होता. धार्मीक ज्ञान ग्रहण करण्याचा व धार्मीक विधी करण्याचा हक्क एका विशिष्ट वर्गापूरताच मर्यादीत होता. त्यामुळे तत्कालीन धर्ममार्तंडाकडून मोठ्या प्रमाणात बहूजणांचे शोषण होत होते.समस्त बहूजन , दीनदलित समाज अज्ञानाच्या खाईत पडून अंधश्रध्दा,कर्मकांडाच्या विळख्यात फसलेला होता. अस्पृश्यांना शुद्रापेक्षाही निच वागणूक दिली जात होती.

    कडक जातीभेद आणी विषमतेचा ऊद्रेक मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अशा काळात  काटसूर जि.अमरावती येथे शके ११०९ भाद्रपद शुद्ध त्रयोदशी ला रात्रो ठीक  १० वाजता पुरोगामी सामाजिक समतेचे अविष्कारक, दिनदलितांचा पाठिराखा, अहिंसेचा पुतळा, 'मानवता धर्माचे खरे पुरस्कर्ता' असलेले श्री 'गोविंद प्रभू' महाराज यांचा जन्म काण्वशाखेतील एका ब्राम्हण कुळात झाला. त्यांच्या मातापित्याचे नाव अनंतनायक- नेमाईसा असे होते. त्यांच्या जन्माने समताधिष्ठीत समाजजिवनाच्या नव्या युगाचा प्रारंभ झाला. ब्राम्हण कुळात जन्माला येऊनही आपल्या वेड्यापिशा वर्तनशैलीने वर्णाश्रमाला कडाडून विरोध करणे, सर्व धर्मशास्त्राचे ज्ञान असूनही वेदप्रामाण्य नाकारून ऊच्चवर्णींयांसोबत शुद्र, अतिशुद्रांना समानतेची वागणूक देऊन श्रीप्रभू बाबांनी पुरोगामी सामाजिक क्रांतीचे बिजारोपण केले होते. 

     श्री गोविंद प्रभूंचे मातापिता बालपणीच कालवश झाले त्यामुळे मामा - मावशीने त्यांचे संगोपण केले. श्री गोविंद प्रभूंनी आपल्या कुशाग्र बुध्दीची ओळख बालपणीच करून दिली होती. वेदाध्ययनासाठी गुरूकूलात असताना ईतर विद्यार्थ्यांना जे ज्ञान ग्रहन करायला एका महिन्याचा कालावधी लागायचा तेच ज्ञान श्रीप्रभू एका दिवसांत आत्मसांत करत असत. आपल्या बालसवंगड्यासोबत गवताचा भारा आणताना त्यांच्या डोक्याला स्पर्श न होता डोक्याच्या वरवरच असायचा. कधी कधी रात्री झोपेत असताना देहातून दिव्य असा तेजोमय प्रकाश निघायचा,असे चमत्कार दाखवून त्यांनी लहाणपणीच आपण दैवी पूरूष असल्याचे दाखवून दिले होते. *त्यांच वागणं - बोलणं वेडेपिसे होते. त्यामागे कारणही तसचं होतं. ज्या समाजसुधारकांनी शहानपनाने  तत्कालीन धर्ममार्तंडाच्या विरोधात वागून सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला त्यांचा धर्ममार्तंडांनी, कर्मठवाद्यांनी नेहमीच छळ केला, प्राणांतीक हल्ले केले हि जाणीव बाळगून त्यांनी आपल्या वेड्यापिस्या वागणूकीतून मानवतेचा नवा धर्म प्रस्थापीत केलेला होता.*

        श्री प्रभुंच्या कार्याचा गौरव करताना महानुभाव कवि प.पू.म.श्री बा.भो.शास्त्री लिहीतात,

*हे आमचे वर्‍हाडाचे दैवत*

*ऐसे होते लोकमत*

*येथेच राऊळांचे चरित्र*

*महान झाले.!* (लि.वै.८२)

*मानवनिर्मित झाल्या जाती*

*त्या विचारांची केली माती*

*मानवतेची धर्मनिती, सांगत होता.* (लि.वै.८३)

      श्री गोविंद प्रभू महाराज यांनी केलेल्या सामाजिक कार्याची वर्णन करताना खाली बाबी प्रामुख्याने दिसतात. एकदा मातंग समाजातील लोकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचीत राहावे लागले होते. त्यांनी श्री गोविंद प्रभूंना आपली व्यथा सांगीतली. तेव्हा श्री प्रभूंनी विशिष्ट जागेवर निर्देश करून जमिन खोदायला सांगीतल्यावर त्या ठिकाणी भरपूर पाणी लागले. तेव्हा ते लोकं म्हणाले, "राऊळ माय : राऊळ बाप", "त्यांचे प्रसादे आम्ही पाणी पित असू." श्री गोविंद प्रभू ऋध्दपूर परिसरात स्वच्छंदरित्या वावरत असत. जातीभेद ,वर्णभेद, लिंगभेंद व तथाकथीत धर्ममार्तंडांच्या बंधनाला झूगारून मांग, महार, तेली, माळी, कुणबी यांच्या घरी जाऊन ते जेवन करायचे,पाणी प्यायचे. त्यामुळे तत्कालीन  शुद्र, अतिशुद्र दीन,दलित,अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजातील सर्वसामान्य लोकांना ते आपलेसेच वाटायचे. कारण जातीभेद, लिंगभेद, वर्णभेद, आणी विषमतेचे बंधने झूगारून देणाऱ्या या ईश्वरी पूरूषाच्या ठिकाणी समस्त मनुष्यमात्रांविषयी अत्यंत प्रेम व जिव्हाळा होता. 

     *ब्राम्हण कूळातील व्यक्तीने असे धर्माविरूध्द वागणे म्हणजे घोर पाप व धर्मद्रोहच होता.पण धर्ममार्तंडांच्या बंधनाला न जूमानता समतेचा संदेश प्रत्यक्ष कृतीद्वारे देणारे श्री गोविंद प्रभू पूरोगामी समाजसूधारक चळवळीचे ऊमस्थानच होते.*

     श्री गोविंद प्रभू रंजल्या गांजल्या जनतेचे माय- बाप होते. समस्त स्त्री जातीचे कैवारी होते.ते नेहमी कोणाच्याही कामात साहाय्य करायचे. कामानिमीतत्य घराबाहेर जाणाऱ्या लेकूरवाळ्या मातेचे बाळ सांभाळणे, कुणाचे लहान बाळ घरी नेऊन पाळण्यात झोपविणे,अंघोळ करताना कुणाची पाठ घासून देणे, कुणाला पाणी भरण्यास मदत करणे, मुसळ धरणे, जेवण वाढायला मदत करणे  एवढेच नव्हे तर स्वता दूध पिऊन सुनेला ताक वाढणाऱ्या सासूच्या घरी जाऊन सुनेला दूध वाढण्याचे कार्य श्री गोविंद प्रभूंनी केलेले आहे. त्यामुळे श्री गोविंद प्रभू खऱ्या अर्थाने दिन, दलित, शोषीत, पिडीतांचे माय- बाप होते.

    *प्रचलित धर्मबंधनांना तोडून आपल्या आगळ्या वेगळ्या वेड्यापिस्या वर्तणूकीद्वारा समतेचा संदेश देणाऱ्या व धर्ममार्तंडाच्या मते धर्मद्रोह करणाऱ्या श्री गोविंद प्रभूंच्या वागणूकीचा धसका काही प्रमाणात का असेना तत्कालीन धर्ममार्तंडांनी घेतलाच. श्री प्रभू मांगामहारांच्या घरी जातात, तसेच पंडीतब्राम्हणांच्याही घरी जातात, त्यामुळे त्यांच्याकडून धर्मभ्रष्ट होत होता. या कारणांमुळे तत्कालीन धर्ममार्तंडांनी व महाजनांनी मांगामहारांची घरे गावाबाहेर काढण्याचे फर्मान सोडले.पण श्री गोविंद प्रभू तिथेसुध्दा जायचे आणी त्यांच्यात मिसळून राहायचे.पण धर्म बूडवला म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई करून शिक्षा देण्याची हिंमत तत्कालीन धर्ममार्तंडांना झाली नाही , याला कारण त्यांच्या ठिकाणी असलेल्या ईश्वरी अस्तित्वाचा प्रभावच आहे असे समजणे गैर होणार नाही.*

     महाराष्ट्रात स्वांतत्रचळवळी सोबतच समाज सुधारणेची चळवळ ऊदयास आली. दलित मुक्ती, सामाजीक समता,बंधूता  समाजात रूजावी यासाठी महात्मा फुले, संत गाडगेबाबा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, छ.शाहू महाराज यांच्यांसमवेत अनेक महान  समाजसुधारकांनी जिवाचे रान करून अथक प्रयत्न केले. देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधूता जोपासण्याची हमी दिली.

पण श्री गोविंद प्रभू महाराज यांनी सूमारे आठशे वर्षांपुर्वीच अत्यंत कर्मठवादी,  विषमतावादी समाजात जातीभेद, लिंगभेद, वर्णभेद निर्मूलन कार्याचा शुभारंभ करून आपल्या कृतीद्वारे सामाजिक समता,बंधूता, अहिंसा, ई. मानवी मुल्यांची शिकवण देऊन आपल्या १२५ वर्षांच्या आयुष्यात अमरावती  जिल्ह्यातील रिद्धपूर परिसरात निरंतर कार्य करून पूरोगामी समाजसुधारक चळवळीचे बीज रोवलेले असताना आजही २१ व्या शतकात पुरोगामी चळवळीचे नेतृत्व करणार्‍या व सामाजिक समतेचे दिंडोंरे पिटवणार्‍या समाजसुधारकांकडून श्री गोविंद प्रभूंच्या समतामुलक कार्याचा साधा उल्लेखही करताना दिसून येत नाही. यामुळे श्री गोविंद प्रभूंच्या कार्याची आजच्या पुरोगामी चळवळीतील पुढार्‍यांनी प्रत्यक्षरीत्या दखल घेऊन अविरतपणे हे कार्य सुरू ठेवण्याची गरज आहे.


*- तृषाल रामटेके....✍️*

सिंदेवाही जि.चंद्रपूर

  *9921837435*



टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट